येडियुरप्पा सरकार एक नंबरचे भ्रष्टाचारी सरकार; अमित शाह यांची जीभ घरसली

बंगळुरु : भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना मुत्सद्दी राजकारणी समजले जाते. पण आज कर्नाटक निवडणुकांबद्दल बोलताना अमित शाह यांची जीभ घरसली. सिद्धरामय्या सरकारऐवजी येडियुरप्पा सरकार हे एक नंबरचं भ्रष्टाचारी सरकार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

अमित शाह सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेत ते काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत होते. शेतकऱ्यांच्या निमित्ताने त्यांनी सिद्धरामय्या सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांचा मृत्यू होत असताना सरकार झोपलं आहे, असं ते म्हणाले. मात्र सिद्धरामय्या सरकारला घेरताना त्यांच्या तोंडून आपल्याच मागील सरकारसाठी टीकेचे शब्द बाहेर पडले.

भाजपाध्यक्ष बोलत असताना त्यांच्या डाव्या बाजूला स्वत: बी एस येडियुरप्पा बसले होते. तर उजवीकडे पक्षाचे आणखी एक नेते बसले होते. यावेळी भ्रष्टाचारात सिद्धरामय्यांऐवजी येडियुरप्पांचे नाव घेतल्यानंतर, उजवीकडे बसलेल्या नेत्याने त्यांना चुकीची जाणीव करुन दिली. यानंतर आपल्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडल्याचे जाणवल्यानंतर अमित शाहांनी शब्द फिरवले. अमित शाह यांचे हे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसनेही व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)