येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : कर्नाटकात राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिल्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात काँग्रेस-जेडीएसने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजता सुनावणी घेण्यात आली. न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

या सुनावणी दरम्यान, येडियुरप्पांचा शपथविधी रोखता येणार नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. आम्ही राज्यपालांना या संदर्भात नोटीस देऊ शकत नाही, तसा अधिकार आमच्याकडे नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)