यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांचा सामना बरोबरीत 

चेन्नई: प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरूवात झाली. या पर्वात प्रत्येक संघात बरेच बदल झाले असल्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली होती. प्रो कबड्डी लीग 2018च्या पहिल्या महाराष्ट्र डर्बीत चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. या मध्ये यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यातील सामना निर्धारित वेळेत 32-32 असा बरोबरीत सुटला. 
पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. यू मुंबाने पिछाडीवरून मुसंडी मारताना सामन्याचे चित्र हलते ठेवले. त्यांनी तोडीसतोड खेळ केला. यू मुंबाने लोण चढवत 17-14 अशी आघाडी घेतली. यू मुंबाच्या सिध्दार्थ देसाईने सर्वाधिक 9 गुण घेतले. यू मुंबाने पहिल्या सत्रात 20-18 अशी अवघ्या दोन गुणांची आघाडी घेतली. पुण्याच्या नितीन तोमरने (9) तोडीस तोड खेळ केला.
मध्यंतरानंतरही दोन्ही संघांमधील चुरस कायम दिसली. यू मुंबाने आघाडी कायम राखण्यावर भर देण्याची रणनीती अवलंबली. सिध्दार्थने त्याचा झंझावात दुसऱ्या सत्रातही कायम राखला. त्याला पुण्याचा नितीन सडेतोड उत्तर देत होता. अखेरच्या दहा मिनिटापर्यंत यू मुंबाकडे 27-25 अशी आघाडी कायम होती. त्याच जोरावर यू मुंबाने 32-30 अशी आघाडी घेतली होती. मात्र अखेरच्या चढाईत यू मुंबाच्या खेळाडूची पकड करून पुण्याने सामना 32-32 असा बरोबरीत सोडवला. 
 
गतविजेत्या पटना पायरेट्‌सला पराभवाचा धक्‍का 
गतविजेत्या पाटणा पायरेट्‌सला सलामीलाच पराभव पत्करावा लागला. तमिळ थलायव्हाजने 42-26 असा दणदणीत विजय मिळवला. पाटणाला पहिल्याच सामन्यात थलायव्हाजने चांगलेच झुंजवले. पहिल्या सत्रात एक लोण चढवताना थलायव्हाजने 26-8 अशी भक्कम आघाडी घेतली. पहिल्या सत्रात अजय ठाकूर (7) आणि सुरजीत सिंग (6) यांचा दबदबा जाणवला. मध्यंतरानंतही थलायव्हाजने लोण चढवत सुरुवातीलाच गतविजेत्यांना कोंडीत पकडले. त्यांनी 32-8 अशी आघाडीत भर घातली. पाटणाच्या प्रदीप नरवालने एकाकी झुंज दिली. अजय ठाकूरने पुन्हा एकदा सुपर 10 गुणांची कमाई केली. 
पाटणाने त्यानंतर सामन्यात पुनरागमनाचे केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले. थलायव्हाजने हा सामना 42-26 असा सहज जिंकला. अजय ठाकूरने सर्वाधिक 14 गुण कमावले. दुसऱ्या सत्रात पाटणाला थलायव्हाजवर एक लोण चढवण्यात यश आले. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)