यू टर्न दिसूनही वाहनचालकांचा कानाडोळा

शॉर्टकटसाठी नियम धाब्यावर बसवल्याने वाहतुकीची कोंडी

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – ग्रेड सेप्रेटरमुळे पोवई नाक्‍यावर जाणाऱ्या बऱ्याच जणांना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. मात्र, काही वाहन चालक त्यातूनही शॉर्टकट शोधत असल्याने अनेकदा बराच काळ वाहतुकीची कोंडी होत आहे. वारंवार सांगूनही दुचाकी व चारचाकी चालक बोर्ड पाहूनही नियम तोडत असल्याने वाहतूक पोलिसही वैतागले असून याबाबत अनेकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे.
ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू झाल्यापासून पोवई नाक्‍यावरून जाणाऱ्यांना अरुंद चिंचोळ्या रस्त्यावरून जावे लागत आहे. सायली हॉटेलपासून पोवई नाक्‍यावर पोलिसांनी दुभाजक म्हणून बॅरिगेट लावले असून सायली हॉटेलच्या समोर नो – टर्नचा बोर्ड लावला आहे. मात्र, हॉटेल महाराजाकडून आलेले अनेक वाहन चालक तो बोर्ड पाहूनही न पाहिल्यासारखे करून नियम तोडून पुढे जात आहेत. पोवई नाक्‍याकडे जाण्यासाठी रयतसंस्थेमार्गे आलेले वाहन चालक सायली हॉटेल मार्गे पोवई नाक्‍याकडे जात असतात. त्यामुळे महाराजा हॉटेलमार्गे आलेल्यांना राजपथाकडे नगरपालिकेमार्गे पुढे जाणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकजण सायली हॉटेलजवळ येताच यू टर्न घेत आहेत. यामुळे सायली हॉटेलसमोर अनेकदा वाहतुकीची कोंडी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)