यूपीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांचा राजीनामा

लखनौ : उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकच वादळ निर्माण झाले आहे. फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे सपा आणि बसपाच्या विजयात काँग्रेसला आनंद मानावा लागला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवरच बब्बर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

राज बब्बर यांनी मंगळवारी कवी केदारनाथ सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक ट्वीट केले आणि त्यातूनही आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते, “”अंत में मित्रों, इतना ही कहूंगा कि अंत महज एक मुहावरा है जिसे शब्द हमेशा अपने विस्फोट से उड़ा देते हैं.”

लोकसभा निवडणुकीला नजरेसमोर ठेवून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून ‘ब्राम्हण चेहरा’ देण्याची शक्यता आहे. जतिन प्रसाद, राजेश मिश्रा किंवा लातेशपती त्रिपाठी यांच्या नावांची चर्चा आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्थिती गेल्या काही निवडणुकांमध्ये विशेष उल्लेखनीय राहिली नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 80 पैकी केवळ 2 जागा, तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सपासोबत लढूनही केवळ 7 जागा जिंकता आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)