यूपीएससी परीक्षेत गिरीश बदोले राज्यात प्रथम

हैद्राबादचा अनुदीप दुरीशेट्टी देशात प्रथम

पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बदोले हा महाराष्ट्रातून पहिला असून, देशात विसावा क्रमांक आला आहे. यूपीएससी परीक्षेत हैद्राबादचा अनुदीप दुरीशेट्टी हा देशातून पहिला येण्याचा मान मिळविला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची दि. 28 ऑक्‍टोबर 2017 रोजी मुख्य परीक्षा झाली होती. तर फेब्रुवारी- एप्रिल कालावधीत मुलाखत घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे. परीक्षेत एकूण 990 उमेदवारांची आएएस, आयएफएस, आयपीएससह आदी पदांसाठी नियुक्‍तीची शिफारस केली आहे. या सर्व उमेदवारांची नावे आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सर्वसाधारण गटातून 476, इतर मागास प्रवर्गातून 275, अनुसूचित जाती गटातून 165 आणि अनुसूचित जमाती गटातून 74 उमेदवारांची निवड झाली आहे. देशात अनुदीप दुरीशेट्टी पहिला, अनू कुमारी दुसरी, तर सचिन गुप्ता तिसरा क्रमांक आला आहे. राज्यात गिरिश बदोले हा प्रथम आला असून, तो उस्मानाबादचा आहे.

राज्यातील गुणवंत उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : गिरीश बडोले (20), दिग्विजय बोडके (54), सुयश चव्हाण (56), भुवनेश पाटील (59), पियुष साळुंखे (63), रोहन जोशी (67), राहुल शिंदे (95), मयुर काटवटे (96), वैदेही खरे (99), वल्लरी गायकवाड (131), यतिश देशमुख (159), रोहन घुगे (249), श्रीनिवास पाटील (275), प्रतिक पाटील (366), विक्रांत मोरे (430), तेजस नंदलाल पवार (436).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)