यूट्युबवरील ब्लॉगर झाला उदार, पाणी मागवून दिली लाखोंची टीप 

ग्रीनवेल: हॉटेलमध्ये वेटरची सेवा आवडल्यानंतर ग्राहक टीप म्हणून काही रक्कम बिलासोबत ठेवतात. अमिरिकेच्या ग्रीनवेल येथील हॉटेलमधील एका महिला वेटरला तब्बल सात लाख रुपयांची टीप मिळाली आहे. ऐलेना कस्टर असे महिला वेटरचे नाव आहे.

विशेष म्हणजे त्या ग्राहकाने पाण्याच्या फक्‍त दोन बाटल्या मागवल्या होत्या आणि लाखो रुपयांची टीप देऊन तो निघूनही गेला. हा ग्राहक म्हणजे यूट्युबवरील प्रसिद्ध ब्लॉगर जिम्मी डोनाल्डसन म्हणजे मिस्टर बिस्ट असल्याचे वृत्त काही माध्यमानी दिले आहे. गतवर्षीही जिम्मी डोनाल्डसनने पिझा डिलिव्हरी देणाऱ्याला अशीच 10 हजार डॉलर्स टीप दिली होती. त्यावेळीही हा चर्चेचा विषय झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिम्मी डोनाल्डसन काही वेळासाठी हॉटेलमध्ये आला. त्याने फक्‍त पाण्याच्या दोन बाटल्या मागवल्या. त्यानंतर निघताना त्याने ऐलेना कस्टरला दहा हजार डॉलर म्हणजे सात लाख रुपयांची टीप दिली. या टीपमुळे एलेना आश्‍चर्यचकित झाली. तिने त्यातील बरीचसी रक्कम स्वतःकडे ठेऊन बाकी सहकारी महिला वेटरमध्ये वाटली.

या जगामध्ये आणखी चांगली माणसे आहेत. जी चांगली काम करतात. टीप म्हणून मोठी रक्कम देताना मी पाहिले आहे, पण 10,000 डॉलर (सात लाख रुपये) देताना पहिल्यांदाच पाहिले.अशी प्रतिक्रिया हॉटेलच्या मालकाने दिली. जिम्मी डोनाल्डसन सोशल मीडियावर मिस्टर बिस्ट या नावाने ओळखले जातात. युट्युबवर त्यांचे 9 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला 5 मिलियम व्ह्यूज मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)