यूजीसीकडून २४ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर

नवी दिल्ली: देशभरात बारावीच्या परीक्षा संपल्या असून लवकरच निकाल लागणार आहेत. मात्र निकालानंतर प्रवेशादरम्यान अनेक विद्यार्थ्यांची बोगस विद्यापीठांकडून फसवणूक करण्यात येते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या यादीत २४ बनावट विद्यापीठांची नावे आहेत.

सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली २४ विद्यापीठे यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करुन सुरु आहेत. या विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही, असे पत्रक यूजीसीने प्रसिद्ध केले आहे.

-Ads-

बनावट विद्यापीठांची यादी-
या यादीत तब्बल ८ बोगस विद्यापीठे दिल्लीतील आहेत. कमर्शियल युनिव्हर्सिटी, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेंट्रिक जूरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इंस्टिट्यूशन ऑफ सायन्स अँड इंजिनियरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, आध्यात्मिक विश्वविद्यालय आणि वाराणसेय संस्कृत विश्वविद्यालय, अशी दिल्लीतील विद्यापीठांची नावे आहेत.

याशिवाय महाराष्ट्रातील नागपूरमध्ये राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर हे एकमेव विद्यापीठ बोगसच्या यादीत आहे. तर उत्तर प्रदेशातील अलीगढ, कानपूर, प्रतापगढ, मथुरा, कानपूर आणि अलाहाबाद मधील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच ओदिशा, पदुचेरी, कर्नाटक, केरळ आणि बिहारचाही या यादीत समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)