यु मुंबा संघाने वेगळ्या पद्धतीने वाहिली गांधीजींना आदरांजली!

प्रो कबड्डीने भारतीय कबड्डी क्षेत्रात नवीन क्रांती आणली आहे. भारतामध्ये  क्रिकेटनंतर सर्वाधीक पहिला जाणारा हा खेळ ठरला आहे.  त्यामुळे  यातील खेळाडू आणि प्रो कबड्डीमधील मोठ्या संघाला प्रत्येक क्रीडाप्रेमी ओळखत आहे. प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक संघ म्हणजे यु मुंबा. हा संघ पहिल्या तिन्ही मोसमात प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात खेळाला. त्यापैकी दुसऱ्या सत्रात त्यांना विजेतेपद मिळवता आले तर पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून यु मुंबाच्या धिकृत ट्विटर खटावरून  गांधीजींच्या प्रसिद्ध वाक्याचे  जिफ फाईल बनवण्यात अली ते ट्विट करण्यात आले. यामध्ये गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य, प्रथम ते  तुम्हला दुर्लक्षीत करतील, त्यानंतर ते तुमच्यावर हसतील, त्यानंतर ते तुमच्यासह लढतील, आणि तुम्ही जिंकाल !  हे झाल्यानंतर तेथे गांधीजींचा पोहो येतो. महात्मा गांधीजींच्या वाक्याचा खूप वेगळ्याप्रकारे खेळाडूंचा आणि समर्थकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी चांगला वापर केला आहे आणि त्याचबरोबर गांधीजींना देखील आदरांजली वाहिली आहे.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)