युवा भारतीय नेमबाजांकडून सोनेरी कामगिरीची अपेक्षा

 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 
नवी दिल्ली  – पुढील महिन्यांत पार पडणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी भारतीय नेमबाजांच्या चमूत तरुण व तडफदार खेळाडूंचा भरणा असून हे खेळाडू आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. या सर्व खेळाडूंनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आश्‍चर्यज्ञकारक कामगिरी बजावली असून राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय युवा नेमबाजांकडून सोनेरी कामगिरीचीच अपेक्षा आहे.
जागतिक नेमबाजी विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला होता. या संपूर्ण स्पर्धेत भारत अग्रस्थानावर राहिला होता. या स्पर्धेत मनू भाकर, मेहुली घोष, अनिश भानवाला, अंजुम मौदगिल या खेळाडूंनी विशेष कामगिरी करताना चार सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदके पटकावत भारताला नऊ पदकांची कमाई करून दिली होती. त्यामुळे वरिष्ठ विश्‍वचषक स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचू शकला.
भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील एकमेव सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा म्हणाला की, राष्ट्रीय रायफल संघटनेच्या दूरदृष्टी आणि नियोजनामुळे आपण विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकलो. तसेच संघटनेने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमधील पराभवातून उभारी घेत युवा खेळाडूंमधील प्रतिभा ओळखून आणि त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यक्रमांची आखणी केल्याने भारताला हे विशेष यश प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदर म्हणाले की, भारतीय संघाच्या विश्‍वचषक स्पर्धेतील कामगिरीने आम्ही खूप उल्हसित झालो आहोत. भारतीय नेमबाजीचे भविष्य आता सुरक्षित हातांमध्ये असून हे युवा खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत निश्‍चितच सोनेरी कामगिरी करतील. विश्‍वचषकात सुवर्णपदक पटकावणारी भारताची युवा खेळाडू मनू भाकर म्हणाली की, विश्‍वचषक स्पर्धेतील कामगिरीवर मी खूष असून राष्ट्रकुल स्पर्धेतही या कामगिरीची पुनरावृत्ती करून भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मला विश्‍वास वाटतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)