युवा पिढीला साक्षरच नव्हे सुसंस्कृत करण्याची गरज

राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे प्रतिपादन ः शिक्षक, विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान

वाई, दि. 4 (प्रतिनिधी) – सध्याच्या युवा पिढीला केवळ साक्षर करुन चालणार नाही. तर त्यांना साक्षरतेबरोबर सुसंकृत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. वाई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. मकरंद पाटील उपस्थिती होते.
यावेळी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव पवार, जेष्ठ विचारवंत सतीशराव कुलकर्णी, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनीताई भोसले, उपसभापती अनिल जगताप, माजी सभापती प्रमोद शिंदे, विजय नायकवडी, सत्यजित वीर, सौ. उमाताई बुलुंगे, बाजार समिती सभापती लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती दीपक बाबर, महादेव मस्कर, मदन भोसले, मनीष भंडारे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शारदाताई ननावरे, सौ. रंजनाताई डगळे, माजी जिल्हापरिषद सदस्य शशिकांत पवार, माजी उपसभापती शंकरराव शिंदे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव माने व पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले, युवकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञांना बरोबर संस्कृतीची जाण महत्वाची.
वाई तालुक्याला शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा असून या तालुक्यातील वाहणार्‍या कृष्णा नदीने विचारवंत दिले. शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो परंतु तो सुसंस्कारित होण्यासाठी संस्कार करण्याची गरज आहे. एकंदरीतच वाई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे, म्हणूनच उच्चांकी पुरस्काराचे वितरण करावे लागले आहे.
आ. मकरंद पाटील म्हणाले, प्राथमिक शाळेतील विद्यार्थीसुध्दा अनेक क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करीत असून चांगल्या प्रतीचे विद्यार्थी घडविण्याचे ज्ञानदानाचे कार्य शिक्षक वृंद करीत आहे, त्यांच्या कामाची शाबासकी म्हणूनच गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. यावेळी आ. मकरंद पाटील व पोपटराव पवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सभापती सौ. रजनीताई भोसले यांनी केले. सूत्रसंचालन केशवराव कोदे तर उपसभापती यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)