युवा ऑलिम्पिक 2026 च्या यजमानपदासाठी भारत प्रयत्नशील

नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) 2026 मध्ये युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि 2032 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅश यांच्याकडे दावेदारी सादर केली आहे.

दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या बॅश यांच्या पत्रकार परिषदेत नरिंदर बात्रा म्हणाले, “”आम्ही तीन क्रीडा स्पर्धाच्या यजमानपदासाठी उत्सुक आहोत. 2026 चे युवा ऑलिम्पिक, 2030 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2032 चे ऑलिम्पिक या स्पर्धाचे आयोजन भारतात व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या स्पर्धाच्या संयोजनासाठी किती स्पर्धा आहे, ते लवकरच कळेल.” याबाबत बॅश म्हणाले, “”भविष्यातील युवा आणि उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाच्या यजमानपदासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन उत्सुक आहे, याची आम्ही नोंद घेत आहोत. त्यामुळे भारतातील क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल आणि अनेक युवकांना प्रेरणा मिळेल.” ते पुढे म्हणाले, “”अजून 2022च्या युवा ऑलिम्पिकचे यजमानसुद्धा निश्‍चित झालेले नाहीत. मात्र, त्यामुळे ही प्रक्रिया सुरू व्हायला अद्याप अवधी असल्यामुळे “थांबा आणि वाट पाहा’ हेच धोरण स्वीकारावे लागणार आहे.”

-Ads-

  उत्तेजक सेवनावर बंधने हवीतच – बॅश

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय बॉक्‍सरकडून तर स्पर्धा सुरू असताना थलिट्‌सकडून नो नीडल पॉलिसीचा भंग झाला होता. त्याबद्दल बोलताना बॅश यांनी परखड मत व्यक्‍त करताना भारतास इशारा दिला. यापूर्वीच उत्तेजक प्रकरणामुळे टोकियो ऑलिंपिकमधील भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंच्या सहभागावर मर्यादा येऊ शकतात, असे संकेत जागतिक वेटलिफ्टिंग महासंघाने दिले आहेत. 2008 ते 2020 या दरम्यान 20 वेटलिफ्टिंग खेळाडू दोषी आढळलेल्या देशांवर निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे. बॅश यांनी या निर्णयाचे स्वागत करीत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंचा सहभाग वाढण्याची शक्‍यता कमी असल्याचे सूचित केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतुक करतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी भारतीय खेळाडूंकडून झालेल्या “नो नीडल’ पॉलिसी भंग प्रकरणाची देखील गंभीर दखल घेतली. केवळ स्पर्धेतच नाही, तर ही योजना शिबिरातही वापरण्यात यावी, असे मत त्यांनी आपल्या भारत भेटीत गुरुवारी व्यक्त केले.

दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी चांगली होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीही साह्य करेल, असे बॅश यांनी सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून भारतीयांनी आपली उच्च क्षमता दाखवून दिली आहे. आता ऑलिम्पिकमध्येही भारताने जास्तीत जास्त पदके जिंकावीत. आम्ही यासाठी साह्य करण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी वर्किंग ग्रुप स्थापन होणार आहे. असे बॅश यांनी यावेळी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)