युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा: महाराष्ट्राच्या तुषार मानेला एअर रायफल प्रकारात रौप्यपदक 

तबाबी देवीने कमावले ज्युडो मधिल पहिले रौप्य 
ब्युनॉस आयरिस: भारताचा नेमबाज तुषार मानेने रविवारी युवा ऑलिंपिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई करून भारताच्या पदकांचे खाते उघडले. त्याने या प्रकारात अंतिम फेरीमध्ये 247.5 गुणांची कमाई करून रौप्यपदकावर नाव कोरले. ग्रिगरी शामाकोव 249.2 गुणांसह सुवर्ण, तर सर्बियाचा ऍलेक्‍सा मिट्रोविच 227.9 गुणांसह ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. तर यानंतर ज्युडो प्रकारात भारताच्या ताबाबी देवीलाही रौप्यपदक मिळालं आहे. याचसोबत ताबाबी भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये ज्युडो प्रकारात (सिनीअर/ज्युनिअर) पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
 
10 मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत तुषारने 623.7 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले होते. अंतिम फेरीत तुषार आणि मिट्रोविच यांच्यामध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस होती. अखेरच्या राउंडपूर्वी तुषारने 228 गुण मिळवून मिट्रोविचला मागे टाकले. मात्र, अखेरच्या फेरीमध्ये तो शामाकोवपेक्षा वरचढ कामगिरी करू शकला नाही. या राउंडमध्ये तुषारची कामगिरी 9.6 व 9.99 अशी होती, तर शामाकोवने 10.4 व 10.7 अशी कामगिरी करत सुवर्णपदक निश्‍चित केले. 
रविवारी झालेल्या सामन्यात 44 किलो वजनी गटात ताबाबीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवत भारतासाठी एक पदक निश्‍चीत केलं होतं. मात्र अंतिम फेरीत तिला व्हेनेझ्युएलाच्या मारिया गिमेन्झकडून पराभव स्विकारावा लागला. याआधी झालेल्या सामन्यात उपांत्य फेरीत ताबाबीने क्रोएशियाच्या खेळाडूवर 10-0 अशी एकतर्फी मात करत अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेत 13 क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे 46 खेळाडू सहभागी झाले आहेत, त्यामुळे भारताच्या खात्यात या स्पर्धेत किती पदक येतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
युवा ऑलिंपिकसाठी भारताने 46 खेळाडूंचा चमू पाठवला असून हा आतापर्यंतचा भारताचा सर्वांत मोठा चमू आहे. भारतीय खेळाडू 13 क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा करतील. यापूर्वी. 2014 साली चीनमधील नानजिंग येथे झालेल्या युवा ऑलिंपिकमध्ये भारताने एक रौप्य व एक सुवर्ण अशी दोन पदकांची कमाई केली होती. 
 
मणक्‍याच्या दुखापतीतून सावरत मिळवले पदक 
ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या तुषार मानेने भारताला पहिलं पदक मिळवून दिले. 10 मी. एअर रायफल प्रकारात तुषारने रौप्यपदकाची कमाई केली, पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवलेल्या तुषारला अंतिम फेरीत अवघ्या 1.7 गुणांच्या फरकाने सुवर्णपदक गमवावे लागले आहे. मात्र, अनेक अडचणींवर मात करुन त्याने युथ ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. 
गेली दीड वर्ष तुषारला मणक्‍याचा त्रास होता होता. मात्र या त्रासावर मात करत तो या स्पर्धेत उतरला. शेवटचे दोन शॉट खेळताना तो जरासा चाचपडला, मात्र त्याने दुखापतीवर मात करुन जे यश मिळवलं आहे त्याचा आम्हाला खूप आनंद देणारे आहे, असे तुषारचे वडील आपल्या मुलाचे कौतुक करताना म्हणाले. तुषारच्या या कामगिरीनंतर अनेक मान्यवर नेमबाजपटूंनीही त्याचं कौतुक केले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)