युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटिनाकडून पराभूत 

ब्यूनोज आयर्स: अर्जेंटिनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्यांदा पराभवाला सामोरं जावे लागले आहे. यजमान अर्जेंटिनाने भारतीय महिलांवर 5-2 अशी एकतर्फी मात केली. पहिल्या तीन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना आज पहिल्यांदाच कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला.

सातव्या मिनीटाला अर्जेंटिनाच्या सेलिना डी सॅंटोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर आठव्या मिनीटाला भारताच्या मुमताझ खानने गोल झळकावत भारताला बरोबरी साधून दिली. मात्र सामन्यावर अर्जेंटिनाच्या महिला खेळाडूंचं वर्चस्व कायम राहिले. 10 व्या मिनीटाला सोफिया रामेलोने गोल करत अर्जेंटिनाला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मध्यांतराला भारतीय खेळाडूंनी सामन्यात पुन्हा एकदा बरोबरी साधली.

-Ads-

मध्यांतरानंतर अर्जेंटिनाच्या महिलांनी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखलं. ठराविक अंतराने लागोपाठ 3 गोल करत अर्जेंटिनाने आपली आघाडी 5-2 अशी वाढवली. यानंतर सामन्यात पुनरागमन करणं भारतीय महिलांना शक्‍य झालं नाही. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

त्यापूर्वी, आक्रमण, बचाव आणि समन्वय अशा तीनही क्षेत्रांमध्ये निर्विवादपणें सरस कामगिरी करणाऱ्या भारताच्या 18 वर्षांखालील महिला हॉकी संघाने दणदणीत विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेतील फाईव्ह-अ-साईड महिला हॉकी स्पर्धेतील आगेकूच कायम राखत भारतीय महिलांनी वानुआतू संघाचा 16-0 असा धुव्वा उडविला होता. या सामन्यात अव्वल आघाडीवीर मुमताझ खानने 4 गोल, तसेच चेतनाने 3 गोल करताना भारतीय महिला संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बलजीत कौर व रीत यांनी प्रत्येकी दोन गोल, तसेच इशिका चौधरी, लालरेमसियामी आणि सलिमा टेटे यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांना सुरेख साथ दिली होती होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)