युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा: भारताच्या अर्चना कामतची उपान्त्य फेरीत धडक

ब्यूनोज आयर्स: भारताची युवा खेळाडू अर्चना कामतने संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेतील महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत उपान्त्य फेरीत धडक मारली. या कामगिरीमुळे अर्चना पदकापासून केवळ एका विजयाच्या अंतरावर पोहोचली आहे. महिलांच्या उपान्त्यपूर्व लढीत अर्चना कामतने अझरबैजानच्या निगेन जिंग हिचा कडवा प्रतिकार 13-11, 8-11, 6-11, 11-3, 6-11, 12-10, 11-7 असा मोडून काढताना अखेरच्या चार खेलाडूंमध्ये स्थान मिळविले. पदकापासून केवळ एका विजयाच्या अंतरावर पोहोचलेल्या अर्चनासमोर उपान्त्य फेरीच्या लढतीत चीनच्या यिंगशा सुन हिचे कडवे आव्हान आहे.

 

यिंगशावर मात केल्यास अर्चनाच्या पदकाची निश्‍चिती होईल. परंतु या लढतीत पराभूत झाल्यास अर्चनाला कांस्यपदकासाठी प्ले-ऑफ लढतीत खेळावे लागेल. अर्चनाने पदकाबद्दल आत्मविश्‍वास प्रकट करताना सांगितले की, उपान्त्यपूर्व फेरीतील विजयामुळे माझे मनोधैर्य उंचावले असून यिंगशासारख्या दर्जेदार खेळाडूलाही नमविण्याचा विश्‍वास मला वाटतो आहे. निगेनसारख्या कसलेल्या खेळाडूविरुद्ध 1-2 अशा पिछाडीवरून मी 3-3 अशी बरोबरी साधू शकले. तसेच सातवी गेम गमावल्यावर पुढच्या दोन्ही गेम जिंकून मी बाजी मारू शकले. त्यामुळे संयम राखल्यास यिंगशालाही हरविणे आणि ऐतिहासिक पदक जिंकणे अवघड नसल्याची खात्री मला वाटते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)