युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा: ध्वजधारक मनू भाकरने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

ब्यूनोज आयर्स (अर्जेंटिना): युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभात भारतीय पथकाची ध्वजधारक म्हणून विश्‍वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती युवा नेमबाज मनू भाकरने ध्वजधारक होउन भारतीय पथकाचे नेतृत्व केले. यावेळी प्रथमच हा कार्यक्रम कोणत्या मैदानात न होता शहरातील मुख्य रस्त्यावर आयोजीत केला गेला होता ज्याला तब्बल 2 लाख प्रेशक्षांनी उअपस्थीती दर्शवली.

ब्यूनोज आयर्स येथे 18 ऑक्‍टोबर पर्यंत ही स्पर्धा पार पडेल. युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पथकात 46 ऍथलीटसह एकूण 68 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय खेळाडू या स्पर्धेत एकूण 13 क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत.

या पथकात महिला व पुरुष हॉकी संघातील प्रत्येकी 9 खेळाडूंसह 4 नेमबाज, 2 रीकर्व्ह तिरंदाज, 2 बॅडमिंटनपटू, 2 जलतरणपटू, 2 टेबल टेनिसपटू, 2 वेटलिफ्टर, 2 कुस्तीगीर, 2 रोइंगपटू, 1 मुष्टियोद्धा, 1 ज्यूदोपटू, तसेच स्पोर्ट क्‍लाइंबिंग प्रकारातील एका खेळाडूचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)