युवा उद्योजकाने सहकार्याने 230 महिलांना घडले त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन

वडगाव मावळ – वारंगवाडी येथील युवा उद्योजकांनी समाजसेवेचा वारसा जोपासत आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी, राजपुरी आदी गावातील 230 महिलांना मोफत भीमाशंकर, तिरुपती बालाजी, अष्टविनायक व त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन घडविले.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, उपसभापती शांताराम कदम, रामनाथ घोजगे आदींच्या हस्ते देवदर्शनासाठी जाणाऱ्या बसचे पूजन करण्यात आले. या वेळी संजय वारिंगे, तुकाराम वारिंगे, दत्ता वारिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते. मोफत देवदर्शनाचे आयोजन उद्योजक सतीश कलावडे, विक्रम कलावडे, महेंद्र वारिंगे, सोमनाथ पवार, प्रफुल्ल शिंदे आदींनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व भाविकांना सुखरूपपणे दोन दिवसाचे देवदर्शन करून आणण्यात आले. ज्या ज्येष्ठांना देवदर्शनासाठी जाता आले नाही, अशा संधी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्‍त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)