युवराज सिंगची पंजाबच्या संघामध्ये एन्ट्री झाल्याने प्रीती आनंदित

मुंबई : आयपीएलच्या ११ व्या मोसमात लिलावामध्ये पुन्हा एकदा युवराज सिंगची किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये एन्ट्री झाली आहे. आता तो पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. परंतु, त्याच्या आगमनामुळे एका व्यक्तीला जास्तच आनंद झाला असल्याचे दिसत आहे.
युवराजला संघात घेतल्यानंतर संघाची मालकीण प्रीती झिंटाला आनंद गगनात मावेनासा झाला. तिने ट्विटरवरुन आपला आनंद व्यक्त केला. युवराजचे पुनरागमन झाले. माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. बल्ले बल्ले….असे तिने ट्विटरवर म्हटले आहे.
यंदाच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला पुन्हा खरेदी केली. दरम्यान युवराजला अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. पंजाबने त्याला दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइजसह संघात घेतले. याआधी सुरुवातीला युवराज पंजाबकडून खेळत होता. मात्र त्यानंतर त्याने पुणे सुपरजायंटकडून खेळण्यास सुरुवाक केली. शनिवारी जेव्हा लिलाव झाला तेव्हा कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. पंजाबने त्याला बेस प्राईजवर खरेदी केली.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)