युवतीच्या आत्महत्या प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

नागठाणे – नागठाणे (ता. सातारा) येथील युवती समीक्षा संजय जाधव (वय.22) हिच्या आत्महत्येप्रकरणी बोरगाव पोलिसांनी सातारा येथील युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. इम्रान हरुन बागवान (वय. 23, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बुधवारी सायंकाळी नागठाणे येथील समीक्षा संजय जाधव या युवतीने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे नागठाणे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत समीक्षा हिस साताऱ्यातील एका युवकाने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी बोरगाव पोलिसांकडे व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. सपोनि संतोष चौधरी यांनी दोषीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर गुरुवारी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुवारी रात्री उशिरा भाऊ ओंकार संजय जाधव याने सातारा येथील इम्रान हरुन बागवान याच्याविरोधात प्रेमसंबंधातुन समीक्षा हिस वेळोवेळी धमकी व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले असल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. शुक्रवारी पोलिसांनी संशयित इम्रान बागवान याला अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि संतोष चौधरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)