युवतीचा विनयभंग; जीपचालकावर गुन्हा

राजगुरूनगर- माझ्याच गाडीत बस असे म्हणत एका 19 वर्षीय युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत विनयभंग केला तर या प्रकारास विरोध केला असता तलवारीने कापून टाकेल असा दम दिल्याची घटना वाडा (ता. खेड) शनिवारी (दि. 28) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका जीपचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जीपचालक आकाश प्रकाश काळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर याबाबत पीडित युवतीनेच फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाडा येथे 19 वर्षीय युवती बाजारासाठी गेली होती, ती परत घरी बुरसेवाडी येथे खासगी जीपने वाडा येथून निघाली होती मात्र, या ठिकाणी असलेले खासगी जीपचे चालक आकाश काळेने त्याच्याच गाडीत बसण्याचा आग्रह धरला. पीडित युवती त्याच्या गाडीत न बसल्याने त्याने हाताला धरून गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध केला असता या चालकाने तिला तलवारींनी कापून टाकेल असा दम दिला. त्यानंतर पीडित युवती दुसऱ्या वाहनाने बुरसेवाडी येथे आली असता मागून येवून पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित युवतीने खेड पोलीस ठाण्यात आकाश काळे विरोधात फिर्याद दिल्यानंतर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार धनंजय सावंत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)