युवतींनी अन्यायाला प्रतिकार करावा ः दीपाली गुरव

रहिमतपूर ः महाविद्यालयात मार्गदर्शन करताना दिपाली गुरव, डॉ. सौ. भाग्यश्री जाधव, प्रा. सुनंदा मोहिते, निता घाडगे, प्रा. डॉ. नलिनी ओवाळ.

रहिमतपूर, दि. 4 (प्रतिनिधी) – समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब आहे. शाळा, महाविद्यालयांतील युवतींना समाजातील विकृत प्रवृत्तींच्या युवकांकडून त्रास होत असतो. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुलींनी निर्भयपणे पुढे यावे असे प्रतिपादन पोलीस नाईक दिपाली गुरव यांनी केले.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयातील लैंगिक छळ प्रतिबंध समितीच्या वतीने आयोजित निर्भया पथक स्थापना व मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्राचार्या डॉ. सौ. भाग्यश्री जाधव, पोलीस कॉस्टेबल नीता घाडगे, समन्वयक प्रा. सुनंदा मोहिते, प्रा. डॉ. नलिनी ओवाळ यांची उपस्थिती होती.
गुरव म्हणाल्या. शाळा, कॉलेजमध्ये येता-जाताना काही मुलांकडून मुलींना त्रास देणे, पाठलाग करणे, सोशल मिडियाच्या माध्यमातून अश्‍लिल संदेश पाठवणे, मोबाईलवर चोरून फोटो काढणे, व व्हिडिओ शुटींग करणे, अशी कृत्ये करणे हे कायद्याने गुन्हे आहेत. यासाठी कलम 354 अंर्तगत संबधित युवकांवर गुन्हा दाखल करता येतो. असे प्रकार घडत असल्यास पालक व मुलींनी पोलिसांनी तयार केलेल्या व्हॉटस ग्रुप वर किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तक्रारदार मुलींची नावे व ओळख गुप्त ठेवली जाईल.
प्राचार्या डॉ. सौ. भाग्यश्री जाधव म्हणाल्या, मोबाईलचे काही चांगले वाईट परिणाम होत असतात. आधुनिक काळात युवा पिढीने मोबाईलचा वापर ज्ञान वृध्दींगत करण्यासाठी करावा. मुलींना त्रास होत असल्यास त्यांनी आपल्या समस्या तक्रार पेटीत टाकाव्यात. याची दखल गांभिर्याने घेतली जाईल.
प्रास्ताविक प्रा. सुनंदा मोहिते यांनी केले. प्रा. डॉ. नलिनी ओवाळ यांनी आभार मानले.

 

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)