युवक पदाधिकाऱ्यांनी तोपर्यंत नगर सोडायचे नाही – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

नगर: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांवर महापालिका निवडणुकीची प्रभागनिहाय जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी निवडणूक पूर्ण होईपर्यंत नगर शहर सोडायचे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी युवक पदाधिकाऱ्यांना सुचना केली आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची बैठक गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी भवन येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यावेळी महापालिका निवडणुकीचे नियोजन करण्यात आले. बैठकीला युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे,नगर तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, पारनेर उपसभापती दीपक पवार, राहाता तालुकाध्यक्ष संदीप सोनावणे, राहुरी तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, जामखेड तालुकाध्यक्ष शरद भोरे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप गांगर्डे, अमोल गिरमे, कर्जत तालुकाध्यक्ष नितीन धांडे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष गणेश ठाणगे, अकोले तालुकाध्यक्ष शंभू नेहे, श्रीरामपूर शहराध्यक्ष गुरुचरणसिंग भटीयानी यांच्यासह विठ्ठल कोकाटे, राजेंद्र आव्हाड, वैभव काळे सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

-Ads-

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा पदाधिकाऱ्यांवर प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आलेली आहे. संबधित युवक पदाधिकाऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे तसेच महापालिका निवडणूक पार पडेपर्यंत युवक पदाधिकाऱ्यांनी नगर शहर सोडायचे नाही अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. भाजप विरोधी 14 युवक संघटनांच्या वतीने दि.25 नोव्हेंबर रोजी दादर ते ठाणे मोर्चा आयोजन केले आहे. युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या सूचनेनुसार या मोर्चामध्ये जिल्ह्यातून 500 युवक सहभागी होणार आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुकानिहाय नियोजन व जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवकच्या संकल्पनेनुसार वन बूथ टेन युथचा या बुथ कमिटी आढावा तालुकानिहाय घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)