युवक कॉंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी विराज शिंदे

उपाध्यक्षपदी शैलेश चव्हाण ; जनरल सेक्रेटरी अभिजीत चव्हाण; ऑनलाइन मतदान  निवडी

कॉंग्रेस पक्षातील संघटनात्मक निवडी नुकत्याच ऑनलाइन पध्दतीने पार पडल्या. यात जिल्हाध्यक्षपदी वाईचे विराज शिंदे यांची निवड झाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा आठशे पस्तीस मतांनी पराभव केला. तर जिल्हा सेक्रेटरीपदी अभिजीत चव्हाण यांची निवड झाली. यासोबतच विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या.
कॉंग्रेसच्या युवक सेलच्या मतदानासाठी गत दोन महिन्यापासून सभासद नोंदणी सुरू होती.

जिह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पहिल्या फळीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळेच जिल्ह्यातून एकूण सोळा हजार युवकांनी कॉंग्रेसचा सभासद नोंदणी फॉर्म भरले होते. त्यापैकी 12 हजार पाचशे सभासद मतदान करण्यास पात्र ठरले. पात्र सभासदांच्याकडून पक्षाने जिल्हा पदाधिकारी निवडीसाठी मतदान करवुन घेतले. 12 हजार पाचशे पैकी 4 हजार 294 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्हाध्यक्ष पदासाठी वाई मतदार संघातील विराज शिंदे व कराड उत्तरमधील शैलेश चव्हाण यांनी अर्ज भरले होते.

शिंदे यांना 2 हजार 556 तर चव्हाण यांना 1 हजार सातशे मतदान झाले. यात विराज शिंदे यांचा आठशे पस्तीस मतांनी विजय झाला. जिल्हा सक्रेटरी पदासाठी एकूण बारा अर्ज आले होते. त्यात अभिजीत चव्हाण यांनी बाजी मारत दोनशे एकत्तीस मतांनी विजय मिळवला. तर यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्षांच्या झालेल्या निवडी पुढील
प्रमाणे कंसात मतदारसंघ व मिळालेली मते अमित चव्हाण (कराड उत्तर,401) दादासाहेब काळे (माण,128) अजित भोसले (कोरेगाव,303) वैभव थोरात ( कराड दक्षिण,701) सचिन काटे (वाई,550)चंद्रसेन कदम (फलटण,108) गिरीश पाटील (पाटण,274) विक्रमसिंह चव्हाण (सातारा,49) यांच्या निवडी मतदान पध्दतीने झाल्या.
नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील,आ.जयकुमार गोरे,मदन भोसले,धैर्यशिल कदम यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पदाचा उपयोग जनतेसाठी
माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर पक्षातील सभासद मतदारांनी टाकलेला विश्‍वास वाया जाऊ देणार नाही. पदाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम करू. सामान्य जनतेला माझ्या पदाचा जास्तीत जास्त उपयोग होईल यासाठी प्रयत्नशील राहणार
विराज शिंदे,नुतन जिल्हाध्यक्ष.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
11 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)