युवक कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेचे गेटबंद आंदोलन

नगर – पाच महिन्यापासून रखडलेल्या मुकुंदनगर येथील विखे पाटील शाळा ते आयेशा मस्जिद पर्यंन्तच्या रस्त्याचे काम आश्‍वासन देवून देखील पुर्ण होत नसल्याने युवक कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेचे गेटबंद आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मनपाच्या प्रवेशद्वारात ठिय्या देवून जोरदार निदर्शने केली.

आयुक्त घनश्‍याम मंगळे यांच्याशी या प्रश्‍नावर चर्चा केली असता, त्यांनी या परिसरात ठेकेदारांसह भेट देवून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.
यावेळी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अज्जू शेख, शहराध्यक्ष गौरव ढोणे, मोहंमद सहाब, मुन्नाशेठ चमडेवाले, फिरोज खान, बाळासाहेब भुजबळ, मोहंमद अली, दानिश शेख, अमन तिवारी, डॉ.साहिल शेख, जरीना पठाण, नलिनी गायकवाड, मोहंमद सहाब, मुजाहिद सय्यद, बब्बी शेख, अरबाज शेख, युनूस शेख, शफिक शेख, शहेबाज शेख आदिंसह मुकुंदनगरचे नागरिक उपस्थित होते.

-Ads-

अनेक वर्षानंतर विखे पाटील शाळा ते आयेशा मस्जिद पर्यंन्तच्या रस्त्याचे भाग्य उजळून काम हाती घेण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी दोन ते पाच फुटा पर्यंन्त खोलीकरण करण्यात आली. तसेच रस्त्याच्या कडेला दगड, माती व खडींचे ढिगार आणुन टाकण्यात आले आहे. मात्र पाच महिने उलटून देखील रस्त्याची परिस्थिती जैसे थी असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुर्वी असलेल्या खराब रस्त्यापेक्षा वाईट अवस्था ठेकेदाराने निर्माण केली असून, मनपा प्रशासन या प्रश्‍नाकडे डोळेझाक करत आहे. येथील शालेय विद्यार्थी व नागरिकांना रहदारी करतांना अनेक लहान मोठे अपघात घडत आहे. तर रस्त्याचे खोलीकरण करण्यात आल्याने मैलमिश्रीत पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)