युवकाशी बोलल्याने युवतीला दांडक्‍याने मारहाण

सातारा – यवतेश्‍वरला तू कोणाबरोबर फिरायला गेली होतीस, तसेच युवकासोबत का बोललीस, अशी विचारणा करून अठरा वर्षीय युवतीला लाकडी दांडके आणि चमड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिरोज काशीम हेलवाककर, आरबाज राजू शेख, शाहरुख राजू शेख, अमीर हेलवाक्कर (सर्व रा. भिमाबाई आंबेडकर, सदर बझार सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. युवकासोबत का बोलली अशी संबंधित युवतीला विचारणा केल्यानंतर संबंधितांनी बेदम मारहाण केली. यामध्ये संबंधित युवती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संशयितांनी तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास हवालदार एम. के. जाधव हे करत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)