युवकावर चाकू हल्ला ; मुख्य आरोपीला बेड्या

वालचंदनगर- कळंब येथील एका युवकावर पूर्ववैमानस्यातून चाकूच्या साह्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या 10 तासाच्या आत पकडल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयाने शुक्रवार (दि. 21) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विठ्ठल किसन शेंडगे, शिवाजी किसन शेंडगे, किसन शंकर शेंडगे, नानासाहेब राजेंद्र शेंडगे, सीमा शिवाजी शेंडगे, अंजना विठ्ठल शेंडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपींचे नावे असून मुख्य आरोपी विठ्ठल शेंडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. तर संजय शिवाजी यादव यांनी फिर्याद दिली आहे. कळंब येथील संजय यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पूर्ववैमनस्यातून
संजय यादव भाच्याच्या मुलीसोबत कळंबमधून लासुर्णे चौकाच्या रस्त्याने रविवारी (दि. 16) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास जात असताना दिपक यादव यास विठ्ठल किसन शेंडगे याने चाकूच्या सहाय्याने छातीत व पोटावर वार केले. यावेळी शिवाजी किसन शेंडगे, किसन शंकर शेंडगे, नानासाहेब राजेंद्र शेंडगे, सीमा शिवाजी शेंडगे व अंजना विठ्ठल शेंडगे यांनी मदत केली असल्याची माहिती संजय यादव यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विठ्ठल शेंडगे यास 10 तासाच्या आत पकडले. न्यायालयाने त्यास शुक्रवार (दि. 21) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी उत्तम भजनावळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)