युवकांसाठी हीच उत्तम संधी…

मुंबई – स्वच्छ भारत उन्हाळी इंटर्नशीप कार्यक्रमात तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. समाज आणि देशासाठी काही करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी ही उत्तम संधी असल्याचे ते म्हणाले. शाळा आणि महाविद्यालयात उत्तम काम करणाऱ्या सर्वोत्तम इंटर्न्सनां राष्ट्रीय पातळीवर मान्यता दिली जाईल.

जे इंटर्न्स आपले कार्य उत्तमरितीने पूर्ण करतील त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रत्येकी 2 क्रेडिट पॉईंट दिले जातील. स्वच्छ भारत उन्हाळी इंटर्नशीप कार्यक्रमासाठी युवक Mygov open forum वर आपले नाव नोंदवू शकतात. स्वच्छतेची मोहिम पुढे नेण्यासाठी युवक आपला हातभार लावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)