युवकांनी समाजाला प्रेरक असे काम करावे

कटगुण ः शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. प्रल्हाद गायकवाड. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

प्रा. प्रल्हाद गायकवाड यांचे आवाहन

पुसेगाव, दि. 25 (वार्ताहर) – राष्ट्रीय सेवा योजनांमधून विशेष श्रमसंस्कार शिबीर युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण होते. सामाजिक बांधिलकी, स्वावलंबन व चारित्र्य संवर्धन या तीन तत्वांवर या योजनेचे काम चालते. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण द्विगुणित करून समाजाला प्रेरक असे काम करावे, असे प्रतिपादन प्रा. प्रल्हाद गायकवाड यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने कटगुण (ता.खटाव ) येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नेतृत्व गुण विकासाबरोबरच जलसंवर्धनविषयक श्रमदानाद्वारे विविध कामे पार पाडली जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आले आहे. अध्यक्षस्थानी सरपंच मीना जावळे होत्या. उदय कदम, प्रसाद गायकवाड, विशाल देवकर, डॉ.विवेक गायकवाड, विशाल पवार, नंदकुमार शिंदे व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. उदय कदम, उपप्राचार्य डॉ. बंडोपंत कांबळे, प्रा. अभिजित शेवडे, प्रा. अरूण कट्टे, प्रा.संग्राम शिंदे, प्रा. संजय क्षिरसागर, डॉ. सादिक तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. अभिजित शेवडे यांनी तर प्रास्ताविक डॉ. संग्राम शिंदे यांनी केले. आभार समिक्षा कदम यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)