युवकांनी कॉंग्रेसच्या प्रवाहात सामील व्हावे : विराज शिंदे

काळगाव – युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात युवकांचे संघटन सुरू असून प्रत्येक तालुक्‍यातील युवक प्रवाहात येत आहेत. कॉंग्रेसने राबवलेल्या धोरणानुसार युवक कॉंग्रेसची वाटचाल सुरू आहे. भाजप विरोधी लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून जिल्ह्यात युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता आक्रमक झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा कॉंग्रेसचे सरकार देशात व राज्यात येणार आहे. तेव्हा युवकांनी कॉंगेसच्या प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केले.

पाटण तालुका युवक कॉंग्रेसची आढावा बैठक ढेबेवाडी येथे नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा युवक कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस अभिजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, जिल्हा प्रभारी अवधूत डुबल, सरचिटणीस नितीन पाटील तालुकाध्यक्ष गिरीश पाटील, पांडुरंग यादव, प्रदीप पाटील, सरपंच अमोल पाटील, पोपटराव कळंत्रे, महेश भोईर, विजय पाचर, सुरज पाटील, गणेश पिसाळ, मानाजी रोडे आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिजित पाटील म्हणाले, जिल्ह्यात युवक कॉंग्रेसमध्ये गट-तट नसून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे मोठे संघटन सुरू आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत युवकांची ताकद काय आहे, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे युवकांनी तालुक्‍यातील प्रत्येक गावात जाऊन पक्षाचे विचार सांगण्याची गरज आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही तेव्हा युवकांनी पक्ष संघटनेला प्राधान्य देऊन गाव तेथे युवक कॉंग्रेसची शाखा स्थापन करावी. अभिजीत कडव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. गिरीश पाटील यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)