युवकांना हवा व्यसनमुक्त आणि निरोगी समाज : युवादिन विशेष

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती.हा दिवस राष्टृीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.त्यानिमीत्त प्रभातने युवापिढीचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.व्यसनमुक्त आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासच युवावर्ग प्राधान्य देताना दिसत आहे. 

 – गुरूनाथ जाधव

मुल्यशिक्षणाची बिजे रूजवणे गरजेचे

वाऱ्याच्या वेगाने आयुष्यातील सगळी आव्हाने पेलणारा युवा त्याला वायु म्हटले जाते.त्याच युवकाच्या जीवावर देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. तो युवक आज दिशा भरकटला असल्याचे दिसते.याचे कारण देशातील 83 टक्के युवक व्यसनाधीन होत आहे.आदर्श नेमके हरवलेत.देश घडवण्याची जबाबदारी आजच्या युवकांवरच आहे. प्रत्येक युवकाने मी स्वत:साठी आणि देशासाठी काय करू शकतो याचा विचार केल्यास देशातील प्रत्येक व्यक्तिचा पर्यायाने राष्ट्राचा विकास होवु शकतो. यामध्ये आज आमच्या तरूणांनी नेमका आदर्श कोणाचा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशा तरूणांचा आदर्श आजच्या युवकांच्या समोर निर्माण करणे आवश्‍यक आहे.मुल्यशिक्षणाची बिजे रूजवणे गरजेचे आहे.
– मिथुन माने,
सहाय्यक प्राध्यापक, एलबीएस, सातारा.

रक्तदान एक चळवळ बनली पाहिजे

महाविद्यालयीन जीवन जगत असताना एका प्रसंगाने रक्ताची उपयुक्तता समजली. पैशाअभावी व वेळेत रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचे दु:ख मनाला खुप वेदना देऊन गेले. यापुढे असे कोणीही रक्त न मिळाल्याने दगावू द्यायचे नाही हा संकल्प मनाशी पक्का केला. तेव्हापासुनच रक्तदान चळवळीची सुरूवात केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रक्तदान शिबिरांचे आयोजन करू लागलो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांना रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदानासाठी प्रवृत्त देखील करू लागलो. रक्त ही नाशवंत गोष्ट आहे जी आपल्या शरीरातच तयार होते. ते फार काळ साठवून ठेवता येत नाही. अनेक कुटुंबातील नागरिकांचे जीव रक्तामुळे वाचतात. त्यासाठी युवा वर्गाने रक्तदानाचा स्विकार केला पाहिजे. यासोबतच रक्तदान एक चळवळ बनली पाहिजे.
– विक्रांत देशमुख,
युवा मोरया सामाजिक संस्था सातारा.

भारतीय बुध्दिमत्तेचा अभिमान वाटतो
जर्मनीत बॅक्‍टेरियाविषयी पीएचडी करताना मला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. भारतीय युवकांच्या बुध्दिमत्तेची कसोटी खऱ्या अर्थाने जगाच्या बाहेर गेल्यावरच समजते. आपली संस्कृती आपला देश आणि परंपरा याचा कायमच अभिमानच वाटतो.

जन्मजात मुलांना विषाणुंपासून संरक्षण करणे त्यांच्या वाढीसाठी आवश्‍यक असते. त्यामध्ये लहान मुलांना इन्फेक्‍शन झाल्यास शरीरात कोणते बदल होतात व त्यावर नेमकं काय केले पाहिजे त्यासाठी औषधे निर्माण करण्याबाबत माझे संशोधन सुरू आहे. युवकांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना.गाव, शहर आणि देशासाठी आपले योगदान काय असेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.विवेकाचा आवाज आपण ऐकला पाहिजे आणि कृती देखील केली पाहिजे.
– शिवाली निलेश दुदूस्कर रा. सातारा
पीएचडी विद्यार्थी जर्मनी

व्यसनमुक्तीसाठी युवाशक्तीची एकजूट व्हावी

राजकारण हे विकासासाठी केले पाहिजे. ती लोकाशाहीची ताकत आहे. आज प्रत्येक जण स्वत:चे अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न करतोय. महापुरूषांच्या विचारांचा आज विसर पडला आहे.युवा शक्तीचा उपयोग हा व्यसनांच्या आहारी जावून कौटूंबिक त्रासासोबत राष्ट्राचे देखील मोठे नुकसान होत आहे. यासाठी गावांमध्ये दारूबंदी चळवळ रूजवण्यासाठी आज युवा शक्तीने प्रयत्न केला पाहिजे. आमच्या ग्रामसभेने सर्वानुमते दारूबंदीचा ठराव केला.

आज प्रत्येक गावातील युवाशक्तीने निर्धार केल्यास गावागावातून दारूची दुकाने हद्द पार होऊ शकतात. महिला भगिनीची यासाठी एकजूट करणे आवश्‍यक बनले आहे. युवकांनी उत्स्फूर्तपणे दारुबंदीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. दारू बंदीची चळवळ करून ती रूजवण्यासाठी युवाशक्तीने पुढाकार घेतला पाहिजे.
मदन साबळे,
सामाजिक कार्यकर्ता, वडूथ

प्रामाणिक प्रयत्न यशाचा मंत्र

युवा शिक्ती विधायक कामासाठी एकत्र आल्यास अभुतपुर्व बदल घडू शकतात. तंत्रज्ञानाची कास आज युवकांच्या हाती आली आहे. मात्र त्यांचा सजग वापर न झाल्याने त्यांच्यामध्ये विकृती तयार होत आहे. सामाजिक भान, जबाबदारी राखण्याचे काम आज युवापिढीच्या मजबूत खांद्यावरच आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य युवकांनी एकत्र येवुन सातत्य पूर्वक प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल आज जगाच्या कानाकोपर्यात पोहचली ती एकीमुळेच.समाजाप्रती किंवा आपल्या ध्येयाप्रती आपले योगदान काय असले पाहिजे याचा विचार देखील प्राधान्याने केला पाहिजे.आपल्या कला आज सर्वापर्यत पोहचवण्यासाठी फक्त आणि फक्त प्रामाणिक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. आणि त्याच्या सोबतीला अभ्यास सुध्दा महत्वाचा आहे.

नितीन पवार –
लेखक, दिग्दर्शक कोरी पाटी प्रोडक्‍शन सातारा.

व्यसनमुक्तीसाठी युवाशक्तीची एकजूट व्हावी
राजकारण हे विकासासाठी केले पाहिजे. ती लोकाशाहीची ताकत आहे. आज प्रत्येक जण स्वत:चे अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न करतोय. महापुरूषांच्या विचारांचा आज विसर पडला आहे.युवा शक्तीचा उपयोग हा व्यसनांच्या आहारी जावून कौटूंबिक त्रासासोबत राष्ट्राचे देखील मोठे नुकसान होत आहे. यासाठी गावांमध्ये दारूबंदी चळवळ रूजवण्यासाठी आज युवा शक्तीने प्रयत्न केला पाहिजे. आमच्या ग्रामसभेने सर्वानुमते दारूबंदीचा ठराव केला. आज प्रत्येक गावातील युवाशक्तीने निर्धार केल्यास गावागावातून दारूची दुकाने हद्द पार होऊ शकतात. महिला भगिनीची यासाठी एकजूट करणे आवश्‍यक बनले आहे. युवकांनी उत्स्फूर्तपणे दारुबंदीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. दारू बंदीची चळवळ करून ती रूजवण्यासाठी युवाशक्तीने पुढाकार घेतला पाहिजे.
मदन साबळे,
सामाजिक कार्यकर्ता, वडूथ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)