युवकांना मतदार होण्याची सुवर्णसंधी

मंचर-मतदार नोंदणीची सर्व व्यवस्था उपजिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. सर्व युवकांना मतदार होण्याची सुवर्णसंधी असून यापासून कोणी वंचित राहू नये. मतदार नोंदणी बरोबर मतदानाचा हक्‍क बजावणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व नवमतदारांनी जागृत राहणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले.
आंबेगाव तालुका विद्या विकास मंदिर विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अजित देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे होते. उपजिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, ज्यांचे वय 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेली आहे. लोकशाहीमध्ये मताचा अधिकार महत्त्वाचा आहे. मतदाराने आपल्या अमूल्य अधिकाराचा निर्भयपणे वापर करावा आणि जगातील मोठी लोकशाही अधिक सक्षम करावी. आंबेगाव तालुक्‍यात मतदार नोंदणीचे काम अत्यंत यशस्वीपणे चालू आहे. या यशस्वी श्रेय त्यांनी तालुक्‍यातील शाळा महाविद्यालयांना दिले आहे. यापुढील काळातही मतदार नोंदणीचे काम अधिक गतीने करुन त्यामध्ये 18 वर्षावरील सर्व मतदार नोंदणी न झालेल्या तरुणांची मतदार नोंदणी प्राधान्याने करावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर पथनाट्य सादर केले. वर्षभरामध्ये मतदार नोंदणीचे काम करणाऱ्या महाविद्यालयातील नोडल ऑफिसर प्रा. राजेंद्र जोशी, प्रा. संजय पोकळे, प्राचार्य डॉ. आय. बी. जाधव यांचा अजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तालुक्‍यातील विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन विजेत्या झालेल्या कल्याणी निघोट, शिवाणी लांडे या विद्यार्थिनीचा तहसील कार्यालयात तसेच मतदार नोंदणी संदर्भात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचाही अजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मतदार दिनाच्या निमित्ताने मतदान हक्‍क बजावण्यासाठी शपथ दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम काळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विलास काळे, शिक्षण विस्तार अधिकारी रामदास पालेकर, राजेंद्र आढळराव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन निवडणूक नायब तहसीलदार सुषमा पैकीकर यांनी केले. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आय. बी. जाधव, सूत्रसंचालन माणिक बोराडे यांनी केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिकेत भोसले यांनी आभार मानले.

  • शाळा-महाविद्यालये, तहसील कार्यालय आदींनी मतदार नोंदणीचे अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे अनेक नवमतदारांची नोंदणी करणे शक्‍य झाले आहे.
    – रवींद्र सबनीस, तहसीलदार, आंबेगाव

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)