युवकांच्या दमदाटीला घाबरून युवतीचा विषप्राशन

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – पिंपोडे बुद्रुक येथील काही युवकांच्या दमदाटीला व त्रासाला कंटाळून येथील युवतीचा विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपोडे बुद्रुक येथे आठवडे बाजारासाठी एक युवती मैत्रिणीसोबत आली होती. साडेसहा वाजता बाजार करून परत जात असताना पिंपोडे बुद्रुक येथील बेघरवस्तीशेजारी हातपंपाजवळ किरण राजेंद्र जाधव, नितीन अशोक आवळे या दोघांनी त्यांना दोन तरुणींना रस्त्यामध्ये अडवून पिडीत तरुणीला तू बाजारात कोणाला हात दाखवला अशी विचारणा व दमदाटी केली. या युवकांसमवेत सुरज शिवाजी शिंदे, नरेंद्र सिद्धार्थ वळींजे, संकेत दयानंद वाघांबरे, मयूर राजेंद्र मोरे, खंडू वसंत साळुंखे, किरण अजित पवार यांनी पीडित तरुणीच्या भोवती घोळका करून तू कोणाला हात दाखवलास, तुला बघून घेतो, अशी दमदाटी केली. त्यानंतर सर्व युवक पीडितेच्या घरापर्यंत गेले. तिच्या आईलाही तुमच्या मुलीला सांगा, आम्हाला हात केला असे म्हणत दमदाटी केली. पीडित मुलीच्या आईने त्यांची समजूत काढल्यानंतर युवक निघून गेले. यानंतर पीडितेने घराशेजारील छपरात जाऊन विषारी औषध प्राशन केले. हे समजताच तिला कुटुंबियांनी पिंपोडे बु।। येथील रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर बनल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशनवर झाली असून युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस कर्मचारी गुजर करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)