युरोपियन समुदाय रशियातील दूताला माघारी बोलावणार

ब्रुसेल्स – ब्रिटनच्या एका माजी हेरावर रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तेथील आपला दूत माघारी बोलावण्याचा निर्णय युरोपियन समुदायाने घेतला असल्याचे वृत्त आहे. तसेच रशियाच्या युरोपियन समुदायातील राजदूताची हकालपट्टी करण्यावरही सध्या विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.

युरोपियन देशांच्या प्रतिनिधींची येथे परिषद सुरू आहे त्यात या घटनेचा आढावा घेण्यात आला असून रशियाला केवळ शाब्दिक इशारा देऊन भागणार नाही तर त्यांना प्रत्यक्ष कृतीने काही धडा शिकवण्याची गरज अनेक युरोपियन देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. युरोपिन समुदायातील 28 देशांच्या प्रमुखांनी एक संयुक्त निवेदन जारी केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की या घटनेच्या संबंधात रशियाने दिलेला खुलासा पुरेसा नाही. ब्रिटनने रशियाच्या 23 दूतांची हकालपट्टी केली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता युरोपियन समुदायही ब्रिटनच्या बाजूने उतरला आहे. ब्रिटनने रशियाशी वरीष्ठ पातळीवरील संबंधही तोडले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)