युरोपमध्ये डाळिंब निर्यातीच्या मोठ्या संधी -बाबासाहेब गोरे

नारायणगाव- जानेवारी ते मार्च या कालावधीत युरोप मार्केटमध्ये डाळिंब निर्यात करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असून, डाळिंब उत्पादकांनी हस्त बहराचे योग्य व्यस्थापन करणे गरजेचे आहे. याकरिता “अनारनेट’ प्रमाणीकरण शेतकऱ्यांना जास्तीचा नफा मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन डाळिंब तज्ज्ञ बाबासाहेब गोरे यांनी व्यक्त केले.
ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे पीक परिसंवादामध्ये फुलोऱ्या अवस्थेतील डाळिंब बागांचे व्यवस्थापन व मार्केटिंग या विषयावर संगमनेरचे डाळिंब तज्ज्ञ बाबासाहेब गोरे यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर तालुका डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष आदिनाथ चव्हाण तसेच सहअध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ तानाजी वारुळे संचालक नारायणगाव हे होते. गोरे म्हणाले के, डाळिंब पिकाच्या फुलोरा या अवस्थेतून फळ अवस्थेमध्ये रुपांतर 60 दिवसांच्या अवधीत होणे गरजेचे आहे. सद्यःस्थिती बाजारभावाचा चढ-उतार आणि गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये असलेले लागवड पाहता आपल्या शेतकऱ्यांना बाजारभाव मिळणे अवघड आहे; परंतु योग्य व्यवस्थापन आणि खर्चामध्ये बचत करून डाळिंबाची बाग फुलविणे गरजेचे आहे. डाळिंब पीक सात महिन्यांचे नसून, 12 महिन्याचे आहे, त्यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे आहे. मादीकळी निघण्याकरिता डाळिंबच्या झाडामध्ये अन्नद्रव्यांचा साठा असणे गरजेचे आहे. कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर यांनी केले. सूत्रसंचलन सुनील ढवळे, राहुल घाडगे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)