युरियासाठी वितरकांची कमाई प्रति मेट्रिक टन 354 रुपये

नवी दिल्ली -युरियाच्या विक्रीसाठी सर्व वितरकांना वितरक कमाई म्हणून प्रति मेट्रिक टन 354 रुपये द्यायला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सुधारित दर 1 एप्रिल 2018 पासून लागू होणार आहेत. केवळ पीओएस उपकरणांच्या माध्यमातून झालेल्या विक्रीवरच ही वितरक कमाई दिली जाईल.

सध्या 18 जून 1999 च्या अधिसूचनेद्वारे खासगी आणि सहकारी संस्थांना खासगी व्यापाराच्या माध्यमातून युरियाच्या विक्रीसाठी प्रति मेट्रिक टन 180 रुपये दर दिला जातो. तर संस्थात्मक संस्थांच्या माध्यमातून विक्रीसाठी प्रति मेट्रिक टन 200 रुपये दर दिला जातो. खत क्षेत्रात थेट लाभ हस्तांतरणाची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर, आर्थिक व्यवहार्यता सांभाळता यावी यासाठी वितरक कमाई वाढवून द्यावी, अशी मागणी वितरक आणि खत कंपन्यांकडून सातत्याने होत होती.

या निर्णयाचा देशभरातल्या सुमारे 23 हजार वितरकांना फायदा होण्याचा अंदाज आहे. यामुळे थेट लाभ हस्तांतरणाच्या अंमलबजावणीनंतर त्यांच्या आर्थिक व्यवहार्यतेत वाढ होईल. यामुळे सरकारवर अतिरिक्त अनुदान भार वार्षिक 515.16 कोटी रुपये पडणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)