युपी सरकारकडून योग दिनासाठी निधीचा गैरवापर

बसपा सुप्रिमो मायावतींचा आरोप
लखनऊ, दि.20 – जागतिक योग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्वांत मोठ्या योग कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, या कार्यक्रमासाठी निधी, साधनसंपत्ती आणि वेळेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप बसपा सुप्रिमो मायावती यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
मायावती म्हणाल्या, मोदी सरकारने सत्तेत असल्याने सरकारी निधी आणि उपकरणांचा वापर करून बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, शेतकऱ्यांच्या हाताला काम देणे, कामगारांसाठी दोन वेळेच्या जेवणाची सोय करणे या महत्वाच्या संविधानिक जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. मात्र, ही कामे न करताना निधी आणि साधनसंपत्तीचा योग दिनासाठी गैरवापर केला जात आहे.
योगा डे ला विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या बाजूने बोलताना मायावती म्हणाल्या, या संघटनांचा निषेध करणारे गरीब लांकांविरोधी आणि शेतकरी विरोधी आहेत. बेरोजगार आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुढील महिन्यात दिल्लीत निती आयोगासमोर आणि जंतरमंतर मैदानावर देशभरातील शेतकरी शांततेच धरणे आंदोलन करणार आहेत.
मायावती पुढे म्हणाल्या, आयटी क्षेत्रातही कामाच्या संधी आणि रोजगारात घट होत असताना केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार ढिलाईची वृत्ती दाखवत असून सरकारी निधी, मशिनरी आणि वेळेचा दुरुपयोग योग दिनासारख्या कार्यक्रमासाठी करीत आहे. या असल्या कार्यक्रमांसाठी द्वेशाची बीजे पेरणारा रा. स्व. संघच कारणीभूत असून त्यांना सरकारी सुविधा आणि सूट कशासाठी दिली जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)