युपी योद्धा आणि दिल्ली यांच्यात कोण ठरणार ‘दबंग’

प्रो कबड्डीमध्ये आज पटणा येथील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आजच्या दिवसाचा पहिला तर लीग मधील ३७वा सामना दबंग दिल्ली आणि युपी योद्धा यांच्यात होणार रंगणार आहे. दोन्ही संघानी प्रत्येकी दोन सामने जिंकले असल्याने या सामन्यात विजय मिळवून आपली गुणसंख्या वाढवण्यावरच दोन्ही संघांचा जोर असणार आहे.

मोठ्या आणि दर्जेदार खेळाडूंच्या अभावी दबंग दिल्लीचा संघ कमकुवत दिसत होता. परंतु, सांघिक खेळाच्या जोरावर या संघाने उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी खेळलेल्या चार सामन्यांपैकी २ सामन्यात विजय प्राप्त केला आहे तर इतर दोन सामन्यांपैकी एकात पराभव व एका सामन्यात ‘टाय’वर समाधान मानावे लागले आहे. दबंग दिल्लीच्या संघात एकही सुपरस्टार खेळाडू नसणे हे संघाच्या पथ्यावर पडले असून त्यामुळे एका खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून न राहता ते सांघिक खेळ करण्याकडे लक्ष देत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युपी योद्धा संघाकडे रिशांक देवाडीगा, श्रीकांत जाधव, प्रशांत राय यांसारखे उत्तम रेडर आहेत. परंतु, संघाकडे डिफेन्समध्ये नवखे खेळाडू असल्याने त्यांना कमी फरकाने सामने गमवावे लागले आहेत. त्यांनी मागील सामन्यात पुणेरी पलटण संघाला हरवले असल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आतापर्यंत युपी योद्धा संघाने खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये २ विजय, ३ पराभव व एका सामन्यात बरोबरी अशी कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणसंख्या वाढविण्यावर त्यांचा भर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)