युपी खाण घोटाळा प्रकरणात छापा सत्र

लखनौ: उत्तरप्रदेशातील खाण घोटाळा प्रकरणात सीबीआयने अनेक ठिकाणी छापे घातल्याचे वृत्त आहे. एकूण 12 ठिकाणी या संबंधात छापे घातले गेले. त्यात आयएएस अधिकारी बी चंद्रकला यांच्या दिल्ली आणि लखनौ येथील सदनिकांवर छापे घातले गेले आहेत.

समाजवादी पक्षाचे आमदार रमेश मिश्रा यांच्यावर या खाण घोटाळ्याचा आरोप असून त्यांच्याही हामीरपुर, नॉयडा, लखनौ येथील निवासांवर छापे घालण्यात आले. सीबीआयचे पंधरा अधिकाऱ्यांचे पथक यातील संबंधीतांची चौकशी करीत आहे. त्यांनी आमदार रमेश मिश्रा यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. या छाप्यांमध्ये काय हाती लागले याचा तपशील अजून सीबीआयने जाहींर केलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)