युपीमध्ये कॉंगेसचे सरकार आणणे हे प्रियांका आणि ज्योतिरादित्य सिंदियांसाठी लक्ष्य !

file photo

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे प्रतिपादन

अमेठी: उत्तर प्रदेशात पुढील सरकार कॉंग्रेसचे आणण्याची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर आपण सोपवली आहे, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभेची निवडणूक कॉंग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधी अमेठी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असतानाच प्रिोयांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. प्रियांका गांधी राजकारणात येणार का नाही याबाबत गेल्या वर्षभरापासून अंदाज वर्तवले जात होते. प्रियांका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तसेच त्यांना उत्तर प्रदेशासाठी कॉंग्रेसच्या सरचिटणीस म्हणून देखील नियुक्‍त करण्यात आले आहे. त्यासंदर्भात ते बोलत होते.

“प्रियांका आणि ज्योतिरादित्य सिंदीया यांना उत्तर प्रदेशसाठी उद्दिष्ट दिले आहे. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूकीत भाजपचा पराभव करून राज्यात कॉंग्रेसचे सरकार आणण्याचे हे उद्दिष्ट आहे.’ असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या प्रमाणे आपण “भाजपमुक्‍त भारत’ असे आपण म्हणणार नाही. तर भाजपबाबत आदरानेच बोलू, असेही राहुल गांधी म्हणाले. गुजरात, उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडूमध्येही कॉंग्रेस “फ्रंट फूट’वरच लढेल. विधानसभेमध्येही कॉंग्रेसचेच सरकार येईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)