“युपीए’च्या अध्यक्षपदी सोनिया कायम राहणार

मोईली यांचे स्पष्टिकरण

हैदराबाद – “युपीए’मधील सर्व घटक पक्षांना एकत्र ठेवण्याची क्षमता असल्यामुळे संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी याच कायम राहतील, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे. भाजपाविरोधात मोठी आघाडी उभारण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू असल्याचेही मोईली यांनी सूचित केले. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाबरोबर “युपीए’चे अध्यक्षपदही तब्बल 19 वर्षे सांभाळले होते. कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर “युपीए’चे अध्यक्षपदही सोनिया गांधी सोडतील आणि राहुल गांधी यांच्याकडे ते पद येईल, असा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला होता. मात्र तशी शक्‍यता नसल्याचे मोईली यांनी आज स्पष्ट केले.

-Ads-

आघाडीतील घटक पक्षांना एकत्र बांधून ठेवण्याचे कौशल्य सोनिया गांधींकडे आहे. त्यांनी यापूर्वी 2004 आणि 2009 मध्ये हे कौशल्य दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अलिकडे विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी अचानक पुढे सरसावले आहे. मात्र याबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटत नसल्याचेही मोईली म्हणाले.

पवार आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी 26 जानेवारी रोजी मुंबईमध्ये “संविधान बचाव’ रॅलीचे आयोजन केले होते. कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची काल दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी महत्वाच्या मुद्दयांवर विरोधकांच्या रणनितीसंदर्भात चर्चा झाली, त्या अनुषंगाने मोईली यांनी हे स्पष्टिकरण दिले.

भाजपाला राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, समाजवात आणि सर्वसमावेशक राजकारणावर विश्‍वास नाही. केवळ बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती करण्याचे काम भाजपाकडून केले जाते. छोट्या प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्‍यात येणे या पक्षांना मंजूर नाही. त्यासाठी भाजपाविरोधी देशव्यापी आघाडीच असायला पाहिजे, असेही मोईली म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)