युनिसेफकडून युवा चॅम्पियन पुरस्कारांची घोषणा 

बालदिनानिमित्त नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानासह पुरस्कार

नवी दिल्ली – देशाच्या शाश्वत विकासात योगदान देण्यासाठी लहान मुलांना एक खुला मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियान आणि युनिसेफ इंडियाने युवा चॅम्पियन पुरस्कारांची घोषणा केली आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि यूएन निवासी समन्वयक तसेच यूएनडीपीचे भारतातील प्रतिनिधी यूरी अफानासी यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी अटल नवोन्मेष अभियान संचालक रामनाथन रामानंद आणि युनिसेफच्या परिचालनप्रमुख लारा सिगरिस्ट फुसे उपस्थित होते.

-Ads-

देशभरातील सहा अव्वल नाविन्यपूर्ण संशोधनासाठी हे पुरस्कार देण्यात आले. गेल्यावर्षी 2 ऑक्‍टोबर रोजी अटल टिंकरिंग प्रयोगशाळांनी अटल टिंकरिंग मॅरेथॉन सुरू केले होते. मुलांना समाजातील समस्यांप्रती जागरुक करणे तसेच त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मागचा उद्देश होता.

20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या 650 संशोधनापैकी 30 संशोधनांची निवड करण्यात आली.
अटल नवोन्मेष अभियान आणि युनिसेफने 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान 72 तासांच्या टिंकरिंग हॅकेथॉनचा शुभारंभ केला. हॅकेथॉनच्या विजेत्यांची घोषणा जागतिक बालदिनी अर्थात 20 नोव्हेंबर रोजी केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)