युनिव्हर्स बॉस इथेच आहे आणि इथेच राहणार’ -गेल

राजकोट, दि. 20 – “युनिव्हर्स बॉस’ (समस्त विश्‍वाचा मालक) ही उपाधी मला आवडते. चाहते ख्रिस गेलला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 10 हजार धावांच्या विक्रमाला स्पर्श करण्याचा क्षण हा माझ्यासाठी खास असाच आहे. “युनिव्हर्स बॉस इथेच आहे आणि इथेच राहणार आहे’, अशा शब्दांत गेलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वप्रथम दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला. आयपीएलमध्ये मंगळवारी गुजरातविरुद्ध लौकिकास साजेशी फलंदाजी करताना त्याने ही कामगिरी केली, त्यानंतर पत्रकारांशी तो बोलत होता.
या सामन्याचा मानकरी ठरल्यावर गेल म्हणाला, मी अजूनही विश्‍वविजेता आहे आणि जिवंत आहे. मला विश्‍वविजेता म्हणवून घ्यायला आवडते. टी-20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी दृढ निश्‍चय असायला हवा. माझ्यासाठी ही विशेष उपलब्धी आहे. चाहते खास करून माझा खेळ बघायला येतात ही भावना मला आनंद देणारी असल्याचे त्यांने स्पष्ट केले.
ख्रिस गेलची टी-20ची आकडेवारी
290 सामने
10,074 धावा
149.51 स्ट्राईक रेट
18 शतके
769 चौकार
743 षटकार
गेलचे विक्रम :
टी20तील सर्वोच्च खेळी गेलच्या नावावर आहे. त्याने 2013च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 66 चेंडूंत 175 धावांची ही खेळी साकारली होती.
टी-20त एका डावात सर्वाधिक 17 षटकाराचा विक्रम गेलच्या नावावर आहे.
टी-20मधील 154 धावा गेलने 13 चौकार आणि 17 षटकाराने वसूल केले आहेत. हा जागतिक विक्रमही गेलच्या नावावर आहे.
टी-20मधील वेगवान शतक गेलच्या नावावर आहे. त्याने 30 चेंडूंत पुणे वॉरियर्सविरुद्ध शतक ठोकले होते.
गेलचा फोटो वापरावा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)