गैरव्यवहार उघडकीला आणण्यास दिरंगाई

नवी दिल्ली – आपल्या बॅंकेतील घोटाळा उघडकीला आणण्यास उशीर केल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेने युनियन बॅंकेला एक कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. बॅंकिंग रेग्युरलेशन ऍक्‍ट मधील तरतूदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

आपल्या बॅंकेत काही आर्थिक गैरव्यवहार होत असतील तर त्या प्रकरणात वेगाने कारवाई करून त्याची माहिती कळवण्याची जबाबदारी बॅंकांचीच आहे पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता या प्रकरणात बॅंकांवर कडक कारवाई करण्याची भूमिका रिझर्व्ह बॅंकेने घेतली आहे.

या प्रकरणी युनियन बॅंकेला 15 जानेवारी 2018 रोजीच नोटीस देण्यात आली होती. त्या प्रकरणात त्यांनी दाखल केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतला आहे अशी माहिती युनियन बॅंकेतर्फेच देण्यात आली आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत याची खबरदारी बॅंकेकडून घेण्यात आली आहे असेही बॅंकेने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)