युनियन अध्यक्षपदासाठी तंटा; 12 कामगारांना घरचा रस्ता

महाळुंगे इंगळीतील जेबीएम कंपनीतील प्रकार : सात कमागारांचे उपोषण सुरू

महाळुंगे इंगळे- कामगार युनियन मधील अध्यक्ष पदाच्या दोन गटात झालेल्या वादाचा फटका कामगारांना बसला आहे. या वादामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठापका ठेवत 12 कामगारांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. हा प्रकार महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील जेबीएम. एमए. ऑटोमोटिव्ह प्रा. लि. कंपनीत घडला आहे. तर यातील सात कामगारांनी कंपनी विरोधात उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपषणाचा आज (गुरुवार)चा दुसरा दिवस असून कंपनी व्यवस्थापनातील कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी उपोषणकर्त्यांकडे फिरकला नसल्याची कैफियत कामगारांनी मांडली.
चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीत दुचाकीसह चारचाकी गाड्यांचे ऑटोमोटिव्हचे छोटे मोठे उत्पादन तयार करणारी जेबीएम. एमए. ऑटोमोटिव्ह प्रा. लि. या नावाची कंपनी आहे. या कंपनीत काही दिवसांपूर्वी कामगार युनियनच्या अध्यक्ष पदावरून दोन गटात किरकोळ वाद झाला होता. त्यापैकी एक गट कंपनी प्रशासनाशी संबंधित असल्याने कंपनीने त्यांच्या माध्यमातून बाहेरची अन्य एक युनियन कंपनीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यामुळे कामगार कंपनी व्यवस्थानावर चिडून होते. त्यामुळे कामगारांनी काही दिवस संपही केला होता. याचा परिणाम उत्पादन प्रक्रियेवर झाल्याचा ठपका ठेवत कंपनी प्रशासनाने बारा कामगारांना तडकाफडकी बडतर्फ केले. बडतर्फ केलेल्या बारा कामगारांपैकी प्रवीण पगारे, दीपक उगले, राधाकिसन गडाख, संतोष वाटकर, रामदास कुटे, चंद्रकांत माने व विनायक म्हसे हे सात कायम कामगार बुधवार (दि. 9) पासून कंपनी समोर उपोषणास बसले आहेत. तर बालाजी तुपकर, वसंत उपासे, विठ्ठल जरे, बाळासाहेब वाघुंडे व स्वप्नील सावंत यांचा बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

  • कंपनीत काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून कामगारांच्या दोन गटामध्ये वाद झाला होता. त्याचा परिणाम उत्पादन प्रक्रियेवर होवून उत्पादनात घट झाली होती. त्यानंतर कामगारांनी संपही केला होता. त्यामुळे कामगारांना बडतर्फ करण्यात आले. ही बाब सध्या न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित आहे.
    – अनिल लाला, मनुष्यबळ विभाग प्रमुख, जेबीएम कंपनी, महाळुंगे इंगळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)