युद्ध गुन्ह्याबाबत असद यांच्या विरोधात सबळ पुरावे

जिनीव्हा – सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात युद्ध गुन्ह्याच्या संबंधातील सबळ पुरावे उपलब्ध आहेत त्या आधारे त्यांना दोषी ठरवून शिक्षा जाहींर करता येऊ शकते असे संयुक्त राष्ट्रांच्या एका आयोगाने म्हटले आहे. सीरियात नागरीकांवर बळाचा मोठा वापर करून त्यांच्या हत्यांना अध्यक्ष कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांनी एक आयोग नेमला आहे.

या आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की या संबंधात जी चौकशी करण्यात आली आहे त्यात अध्यक्षांच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध झाले आहे त्या आधारे त्यांना दोषी ठरवले जाऊ शकते. तथापी सीरियातील घटनांबाबत कोणत्याही आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याची सोय नसल्याने तेथील नागरीकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे असेही या आयोगाशी संबंधीत काही सदस्यांनी म्हटले आहे. आम्ही सीरियाच्या अध्यक्षांच्या विरोधात अहवाल दिला तरी त्याचा काही परिणाम होण्याची शक्‍यता नसल्याने आम्हालाच नैराश्‍य आले आहे असेही आयोगाच्या एका सदस्याने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)