“युथ गेम्स’साठी महापालिका मोजणार 36 लाख रुपये

पिंपरी – केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत “खेलो इंडिया युथ गेम्स-2019′ होणार आहेत. बालेवाडीत होणाऱ्या स्पर्धेसाठी महापालिका 36 लाख रुपये खर्च करणार आहे.

स्थायी समिती सभेत आयत्यावेळी या विषयाला मंजुरी देण्यात आली. आगामी ऑलंपिक आणि आशियाई स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने गुणवंत व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि येत्या काळात भारत खेळामध्ये महाशक्ती व्हावा यासाठी केंद्र शासनातर्फे “खेलो इंडिया युथ गेम्स’ आयोजित करण्यात येतात. त्याअनुषंगाने केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षाखालील “खेलो इंडिया युथ गेम्स-2019’चे आयोजन करण्यात येणार आहे. 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत होणारी ही द्वितीय स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

-Ads-

या स्पर्धेत ऍथलेटिक्‍स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, टेनिस, जिमनॅस्टीक, ज्यूदो, शुटींग, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, कुस्ती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल आदी विविध अठरा खेळ होणार आहेत. या स्पर्धेत सुमारे एक हजार खेळाडू, तांत्रिक अधिकारी आणि स्वयंसेवक सहभागी होणार असून स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय आणि राज्याचे क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. या क्रीडा स्पर्धेतील काही कामांची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)