युती झाली, पण मित्रपक्षांना विसरले – आठवले

अमित शहांना भेटणार

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. याचा अर्थ सेना-भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडून द्यावे, असा नाही. आम्हाला दुर्लक्षित कराल, तर आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करू. त्यामुळे सेना-भाजपने सामंजस्याची भूमिका घेत मित्र पक्षांचा सन्मान करावा, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. आयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, “दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आम्ही मागणी करीत आहोत. ईशान्य मुंबईही चालेल. पण, युतीने आम्हाला लोकसभेसाठी किमान एक आणि विधानसभेसाठी सात-आठ जागा सोडाव्यात. गेली साडेचार वर्षे शिवसेना भाजपविरोधात वक्तव्य करीत आहे. तरीदेखील भाजपने त्यांना जवळ केले. आम्ही वेळोवेळी साथ देऊनही आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. तसेच महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांची भेट घेऊन मित्र पक्षांसाठी जागा मागणार आहोत. त्यासाठी अमित शहा यांचीही भेट घेणार आहोत. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरीत दि.22 मार्चला होणाऱ्या रिपब्लिकन मेळाव्यात आमची ताकद दाखवून देऊ.’

“भाजप-शिवसेना यांची युती झाली, ही चांगली बाब आहे. त्यासाठी मीही प्रयत्न करीत होतोच. परंतु, युती झाल्यावर दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांना डावलले आहे. रिपाइंच्या मदतीशिवाय युतीला यश मिळणार नाही. माझ्यामागे समाजातील मोठी ताकद आहे,’ असाही दावा आठवले यांनी केला.

…तर मीही वाकडा
“मी सरळ मनाचा माणूस आहे. माझ्याशी कुणी वाकडे वागले, तर मीही वाकडा आहे. शरद पवार यांचा मी चांगला मित्र होतो. पण, आता मी नरेंद्र मोदी यांचा मित्र आहे. शरद पवार, छगन भुजबळ यांच्याकडून भेटीचे निमंत्रणे येत आहेत. पण भाजप मित्रपक्षांना न्याय देईल असे वाटते, असेही आठवले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)