युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरु ठेवणार- चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपाची युती व्हायला हवी. आमच्या संबंधाच्या आधारे युतीची बोलणी सुरुच आहे. युतीसाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, असा विश्वास व्यक्त करतानाच आम्ही एकत्र आलो तर विरोधक “भुर्रकन’ उडून जातील, असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत भाष्य केले. राज्यात गेल्या चार वर्षांत अशी एकही निवडणूक नाही जी भाजपाने जिंकली नाही. भाजपा आणि शिवसेना या सर्व निवडणूका वेगवेगळ्या लढूनही हे यश मिळाले आहे. निवडणुकांची आकडेवारी पाहता शिवसेनेने देखील अनेक निवडणूकांत यश मिळविले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मदत होईल, असे शिवसेनेने वागू नये. भाजपासोबत युती करूनच पुढील निवडणूका लढवाव्यात असे आवाहन पाटील यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणूकांच्या आकडेवारीचे विश्‍लेषण करता हेच दिसून येते की जर भाजपा आणि शिवसेना एकत्र येउन लढले तर समोर कोणी उरणारच नाही. यासाठी आता शिवसेनेने विचार करण्याची गरज आहे. कॉंग्रेसला मदत होईल असे न वागता राज्यातल्या जनतेच्या हिताचा विचार शिवसेनेने करावा, असे आवाहन करतानाच कॉंग्रेसची पंधरा वर्षांची राजवट योग्य होती असे शिवसेनेला वाटते का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.

जागावाटपाची चर्चा एका चहात संपेल 

गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपाने मिळून 42 जागा तर जिंकल्या आहेतच. उरला प्रश्न 6 जागांच्या वाटपाचा.तो तर एका चहाच्या चर्चेत संपेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. जागावाटपाचा प्रश्न संपल्यानंतर या 6 जागा निवडणुकीत आरामात खिशात घालता येतील. विधानसभेलाही आमच्या दोघांच्या मिळून 185 जागा आहेत. एकत्र आलो तर आणखीन 15 ते 20 जागा सहज खिशात घालू, असेही पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)