युतीसाठी राम मंदिराचा मुद्दा – मा. गो. वैद्य 

मुंबई – युतीसाठी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे. तसेच जानेवारी महिन्यापर्यंत सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल असे वाटत नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा .गो. वैद्य यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचे युती सरकार आहे.
मात्र या दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नसल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे.

अशात भाजपाने अनेकदा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी मात्र शिवसेना पक्षप्रमुख यांनी हा मुद्दा उचलून धरत थेट अयोध्येला जाण्याचीच घोषणा केली. अध्यादेशाबाबत वैद्य म्हणाले, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणासाठी जानेवारीतली तारीख दिली आहे. तोपर्यंत सरकार वाट बघेल, असा अंदाज आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या बाजून निर्णय दिला नाही किंवा हे पुढची तारीख दिली तर सरकार अध्यादेश आणू शकते, असाही अंदाज वैद्य यांनी वर्तवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)