युतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिले…. – उद्धव ठाकरे 

बीड – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युती होणार कि नाही, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिले आहे. परंतु, युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचे काय करता ते बोला, अशी थेट विचारणा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, दिवाळीमध्ये रामदास कदम यांनी शिवसेनेतर्फे ५ हजार कुटुंबीयांना धान्य वाटप केले होते. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे, असे म्हणून ते पुढे म्हणाले, दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. केवळ कोरडी भाषणे आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नसतात. केंद्रीय पथक येथे येऊन गेले. परंतु, तुमच्या हातात काही मदत पडली का? मग ते लेझिम पथक होते का बँजो पथक, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला. मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो, असेही त्यांनी सांगितले. पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

राम मंदिरावरून निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिले? ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात.

दरम्यान, मराठवाडा दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)